"तुम्ही कोणत्या दिवशी नखे कापता? चुकीच्या दिवशी नखे कापल्यास होऊ शकतो मोठ नुकसान!"
👉👉कोणत्या दिवशी नखे कापणे योग्य ठरेल? जाणून घ्या वैज्ञानिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून!
जगातील सर्वांत मुख्य संस्कृती असल्याने या संस्कृतीत असणारे नियम पथ्य पालन करणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीत प्रत्येक गोष्टीला एक कारण, एक नियम, आणि त्यामागे धार्मिक व वैज्ञानिक विचार असतो. त्यातच "कोणत्या दिवशी नखे कापावीत?" हा प्रश्न अनेक लोकांच्या मनात असतो. आज आपण या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत की कोणत्या दिवशी नखे कापणे योग्य ठरते आणि कोणत्या दिवशी टाळावे, तसेच त्यामागील कारणे कोणती आहेत.
👨धार्मिक दृष्टिकोनातून नियम
हिंदू धर्मात रविवार, मंगळवार आणि गुरुवार या दिवशी नखे कापू नयेत असे मानले जाते. यामागे अनेक धार्मिक समजुती आहेत:
-
रविवार – हा दिवस सूर्यदेवतेचा मानला जातो. या दिवशी शरीराचे कोणतेही अंग कापणे अशुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी नखे किंवा केस कापणे वर्ज्य मानले जाते.
-
मंगळवार – हा दिवस मंगल ग्रहाचा असून, आरोग्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. नखे कापल्याने शरीरातील उष्णता वाढू शकते अशी समजूत आहे.
-
गुरुवार – गुरु म्हणजेच ज्ञान व देवांचा प्रतिनिधी. या दिवशी शरीर छेदू नये, असे धर्मशास्त्रात म्हटले आहे.
👍वैज्ञानिक दृष्टिकोन
या धार्मिक नियमांचा वैज्ञानिक अर्थही आहे त्या मुळे नियम पाळणे आवश्यक आहे. पूर्वी च्या काळात औषधं, स्वच्छता आणि आधुनिक सोई सुविधांचा अभाव होता. त्यामुळे शरीराचे काही भाग कापल्याने संसर्ग होण्याची शक्यता अधिक होती. रविवारी विश्रांती आणि आरामाचा दिवस असल्यामुळे शरीराला दुखापतीपासून वाचवण्यासाठीही नखे न कापण्याचा नियम बनवण्यात आला.
💗कोणते दिवस योग्य?
सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार हे दिवस नखे कापण्यासाठी योग्य मानले जातात. या दिवशी नखे कापल्यास कोणताही धार्मिक किंवा आरोग्याशी निगडित अडथळा उद्भवत नाही. विशेषतः बुधवार हा सर्वात शुभ दिवस मानला जातो.
जीवनावर होणारा परिणाम
अनेकजनाचे असे अनुभव आहेत की त्यांनी धार्मिक नियम पाळल्यावर त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल झाले. अशा लहानशा सहान सवयी आपलं मानसिक स्वास्थ्यही सुधारतात आणि मनाला आत्मिक समाधान देतात.
निष्कर्ष
"कोणत्या दिवशी नखे कापावीत?" हा प्रश्न फक्त धार्मिक नाही, तर आपल्या आरोग्याशीही निगडित आहे. जर तुम्ही या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं, तर ते तुमच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवू शकतात.


0 टिप्पण्या