तिशी नंतर आरोग्य साभांळा ग बाई

   


तिशी नंतर आरोग्य साभांळा ग बाई 

          ३० वय हा जीवनातील महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे या वयानंतर जर तुम्ही वेळेवर काही गोष्टी पाळल्या. तर तुम्हाला पुढे जाऊन काहीच त्रास होणार नाही.वयानुसार माणसाच्या शरीरात विविध बदल होत राहतात. जस जसं वय वाढत जातं तस तसं प्रत्येक माणसावरील जबाबदा-यांमध्ये वाढ होत जाते व त्यानुसार आपल्या वागण्यात, कामात काही बदल करावे लागतात. तशाच काही चांगल्या सवयीही आपल्याला लावून घ्यायला लागतात. त्यापैकीच एक म्हणजे वयाची तिशी ओलांडली की विविध तपासण्या करून घेणे होय.तर त्या कोणत्या टेस्ट आहेत हे पाहुयात.



               निरोगी राहण्यासाठी नियमित वैद्यकीय सल्ला घेणे आणि काही चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. अनेक आजारांचे वेळीच निदान करून उपचार केले तर त्याचे गंभीर स्वरूप धारण करण्याचा धोका बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो. वयाच्या ३० वर्षांनंतर प्रत्येकाने नियमित तपासणी करून घेणे आवश्यक आहे.कोणत्या चाचण्या कराव्यात?गेल्या दोन-तीन दशकांत मधुमेह आणि हृदयरोगाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.त्यामुळे नियमित रक्त तपासणी, कोलेस्टेरॉल तपासणी आणि रक्तदाब तपासणी भविष्यात कोणताही गंभीर आजार टाळण्यास मदत करू शकतात.


                   शुगर तपासणी सोबत दर सहा महिन्यांनी तुमचे कोलेस्ट्रॉल तपासण्याचे सुनिश्चित करा. यामुळे मधुमेह-हृदयविकारांचे धोके जाणून घेण्यास मदत होईल.थायरॉईड टेस्टकोलेस्टेरॉल, लिपिड टेस्ट, ब्लड प्रेशर टेस्ट तुम्हाला वेळेत त्याचे धोके ओळखण्यासाठी आणि टाळण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. थायरॉईड आणि इतर तपासण्या देशात वयाच्या 40-50 पर्यंत बहुतेक लोक थायरॉईडच्या समस्येचे शिकार होतात. हा विकार संपूर्ण शरीरासाठी हानिकारक आहे. लठ्ठपणामुळे वाढणाऱ्या थायरॉईडची वेळोवेळी तपासणी करून घेणे. अती आवश्यक आहे. त्यावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. 

             किडनी-लिव्हर फंक्शन टेस्ट करून तुम्ही पचन आणि संबंधित आजारांचा धोका कमी करू शकता. तुमच्या आरोग्यानुसार कोणत्या चाचण्या आवश्यक आहेत हे जाणून घेण्यासाठी तज्ञाचा सल्ला घ्या.महिलांनी विशेष लक्ष द्यावे.



        भारतातील महिलांमध्ये अशक्तपणाची समस्या खूप सामान्य आहे ज्यामुळे कालांतराने अनेक गंभीर आजार होऊ शकतात. दर सहा महिन्यांनी तुमची हिमोग्लोबिनची पातळी तपासा.व्हिटॅमिन डीमजबूत आणि निरोगी हाडांसाठी व्हिटॅमिन डी महत्त्वपूर्ण आहे. व्हिटॅमिन डी हे बऱ्याच रोगांना प्रतिबंध करण्यास मदत करते. आपल्या शरीरातील व्हिटॅमिन डीची पातळी रक्त तपासणीद्वारे तपासली जाऊ शकते. भारतातील व्हिटॅमिन डीची कमतरता सामान्य आहे. त्यामुळे जर तुम्हाला व्हिटॅमिन डी ची कमतरता भासत असेल, तर तुम्ही ही चाचणी नक्की करुन घ्यावी.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या